अमित शाह अन् एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा, एकाच गाडीतून प्रवास, नेमकं काय घडलं?
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. उद्यापासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत असतानाच रविवारपासून दिन दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांची रविवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी या दोन नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली असल्याचे समजते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी अमित शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तब्बल अर्धा तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते. या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच लंडन दौरा झाला. या दौऱ्यावेळी त्यांनी घेतलेल्या भेटीविषयीची माहिती त्यांनी दिली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये गांभीर्याने विचारमंथन झाले. या भेटीनंतर, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी एशियाटिक लायब्ररीच्या दिशेने प्रवास केला. या प्रवासादरम्यानही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा सुरूच होती.
ही भेट राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात या चर्चेचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईच्या फोर्टमधील दी एशियाटिक सोयायटीला अमित शहा यांनी भेट दिली.
त्यानंतर एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधला. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. एशियाटिक सोसायटीच्या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.