Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महावीर स्टेट ॲकॅडमी, कसबे डिग्रजचे जयकुमार चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

महावीर स्टेट ॲकॅडमी, कसबे डिग्रजचे जयकुमार चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सांगली : खरा पंचनामा 

महावीर स्टेट ॲकॅडमी, कसबे डिग्रज येथील शिक्षक जयकुमार चव्हाण यांना कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्सच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

चव्हाण यांना २२ वर्षांचा अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून, ते वेळेचे काटेकोर पालन करणारे, अत्यंत विनम्र आणि समर्पित शिक्षक म्हणून ओळखले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक काळजी घेणे आणि ज्या विद्यार्थ्यांना अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणे हे त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या समर्पित कार्यामुळेच दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांच्या विषयाचा १००% निकाल लागत असून, इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण मिळत आहेत. हा पुरस्कार कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्स मीटमध्ये उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते चव्हाण सरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे फाऊंडर डी. डी. चौगुले, अध्यक्ष रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष पोपटराव डोरले, सेक्रेटरी अजितप्रसाद पाटील, संस्थेचे विश्वस्त प्रशांत अवधूत, सुदर्शन शिरोटे, डॉ. बाळासाहेब चोपडे, महावीर चौगुले, नितीनकुमार चौगुले, मिलिंद भिलवडे, तसेच एस. के. एस. पी. कॉलेजचे प्राचार्य किरण वाडकर सर_ व महावीर स्टेट ॲकॅडमीच्या प्रिन्सिपल जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.