Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माणुसकीचे नाती जपणाऱ्या ‘आयुष सेवाभावी संस्थे’चा आधुनिक समाजाच्या विकासाचा पाया रचणाऱ्या अभियंत्याकडून सन्मान

माणुसकीचे नाती जपणाऱ्या ‘आयुष सेवाभावी संस्थे’चा आधुनिक समाजाच्या विकासाचा पाया रचणाऱ्या अभियंत्याकडून सन्मान

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सामाजिक क्षेत्रात निःस्पृह भावनेने आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या आयुष सेवाभावी संस्था, कुपवाड चा अभियंता दिनानिमित्त सामाजिक कार्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स(इंडिया) यांच्या कडून विशेष सन्मान करण्यात आला. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार इंजिनिअर प्रसाद कुलकर्णी( कौशल्य तंत्रज्ञान केंद्र प्रमुख तथा नवीन उत्पादन विकास विभागाचे प्रमुख, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्कर) आणि डी. वाय. पाटील ऑग्रीकल्चरल अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे चे कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आयुष सेवाभावी संस्था माणुसकीच्या भावनेतून अडचणीच्या काळात गरजूंच्या मदतीला उभी राहते. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात पोहोचविणे, गरजू रुग्णांसाठी रक्तदाते उपलब्ध करून देणे, उपचार व शासकीय सुविधांसाठी पाठपुरावा करणे, तसेच माफक दरात वैद्यकीय सेवा व चष्मे उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था करीत आहे. संस्थेच्या सर्व टीम च्या या निःस्वार्थ सेवाभावाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. हा सन्मान केवळ संस्थेचा नसून, अडचणीच्या प्रसंगी समाजाच्या मदतीला धावून जाणाऱ्या संपूर्ण सेवाभावी टीमच्या माणुसकीचा सन्मान आहे.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)च्या स्थानिक केंद्राच्या वतीने १५ सप्टेंबर अभियंता दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंते, वरिष्ठ अभियंते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)च्या स्थानिक केंद्राचे अध्यक्ष अजय देशपांडे, मानद सचिव योगेश चिमटे यांच्यासह इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनर्स चे कमिटी मेंबर आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.