Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वडड्डी येथील चोरी प्रकरणाचा उलगडा : संशयिताला अटक करून १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्तमिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

वडड्डी येथील चोरी प्रकरणाचा उलगडा : संशयिताला अटक करून १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वडड्डी (तालुका मिरज) येथे घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गोळीबार मैदान, वडड्डी येथील २१ वर्षीय जग्या कलियुग भोसले या संशयिताला अटक करून त्याच्याकडून १०,००० रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन असा एकूण १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते २६ जुलै २०२६ च्या मध्यरात्री मौजे वडड्डी परिसरात अंधाराचा फायदा घेऊन फिर्यादी अर्जुन तानाजी पवार (वय २६) यांच्या वडिलांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम, तसेच फर्निचर दुकानातील कामगारांचे मोबाईल आणि विहिरीवरील केबल असा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वडड्डी येथे सापळा रचून आरोपी जग्या भोसले यास शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.