मिरजवासियांनी दिलेलं सन्मानपत्र मौल्यवान : पोलीस अधीक्षक तुषार दोशी
महात्मा गांधी चौक मंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप
मिरज : खरा पंचनामा
मिरज वासियांनी पोलिसांना सहकार्य करत गेल्या काही वर्षात विना गालबोट गणेशोत्सव साजरा केला आहे. पोलिसांना नेहमी सहकार्य करत सूचनांचे पालन केले आहे. अशा उत्सवात मिरज वासियांच्या आणि महात्मा गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात आलेले सन्मानपत्र मौल्यवान आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.
गणेशोत्सवाच्या आज पाचव्या दिवशी महात्मा गांधी चौक गणेश मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केली होते. यावेळी वारकऱ्यांच्या हस्ते अधीक्षक दोशी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधीक्षक दोशी यांच्याहस्ते महाप्रसादाचे वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, गांधी चौकचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, वाहतूकचे निरीक्षक तिप्पे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मंडळाचे प्रमुख प्रभात हेटकाळे यांनी संयोजन केले.
मंडळाचे डॉ. विकास पाटील धनंजय गडदावर, पप्पू सावंत, अशोक कदम, इम्तियाज पठाण, बंटी समुद्रे, अभिषेक भोसले, विनायक शेडबाळे यांनी संयोजन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.