Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरी जाऊन नोटीस देण्याला कायदेशीर आधार आहे का? असीम सरोदेंनी सांगितली नेमकी प्रक्रिया

घरी जाऊन नोटीस देण्याला कायदेशीर आधार आहे का? असीम सरोदेंनी सांगितली नेमकी प्रक्रिया 

मुंबई : खरा पंचनामा 

दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंना ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस सुपूर्द करण्यासाठी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन वकिलांसह काल (१९ सप्टेंबर) मातोश्री निवासस्थानी पोहोचले. यावेळी शिवसैनिकही त्यांना अडविण्यासाठी मातोश्रीवर पोहोचल्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा गराडा मातोश्री निवासस्थानाबाहेर पाहायला मिळाला. दरम्यान, एखाद्याला प्रत्यक्ष भेटून नोटीस देण्याची कायदेशीर तरतूद आहे का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो आहे. यावर वकील असीम सरोदे यांनी माहिती दिली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा त्यात उल्लेख असल्याची माहिती समोर आली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. एवढेच नाही तर आपण दिशा सालियनला ओळखतही नव्हतो आणि कधीही भेटलो नाही, असा दावा केला होता. या दाव्यानंतर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी वकिलांमार्फत मानहानीची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, या मानहानीच्या नोटीशीमध्ये काय दावा केला आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

'एखाद्या प्रकरणाची नोटीस द्यायला एखादी व्यक्ती स्वतः वकिलांचा फौजफाटा घेऊन कुणाच्या घरी जाते याला काही कायदेशीर आधार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला.

महाराष्ट्रातून अनेक जण मला फोनकॉल करून असा प्रश्न विचारीत असल्याने कायदेशीर माहिती देणे आवश्यक आहे', असं म्हणत असीम सरोदे म्हणाले, 'क्रिमिनल केसमध्ये प्रत्यक्ष कुणाच्या घरी जाऊन नोटीस सर्व्हिस करण्याची प्रक्रिया नाही. अपवादात्मक परिस्थितीत केवळ न्यायालयाच्या परवानगीने तसे करता येते. सिव्हिल कायदा प्रक्रियेत रूल 9A नुसार तशी दस्ती समन्स प्रक्रिया न्यायालयाचा आदेश झाल्यावर उपलब्ध आहे.'

ते पुढे म्हणाले, 'याप्रकरणी मातोश्रीवर नोटीस घेऊन जाणाऱ्यांना कायदा आदित्य ठाकरेंवर एक हत्यार म्हणून वापरायचा आहे, खरे तर कायदा हे 'साधन' म्हणून वापरायचे असते. 'दिशा' चुकविली जातेय कारण 'हंगामा खडा करना यही मकसद है!'

'ही नौटंकी आहे, यांची मुलगी वारली आहे, दुःखद निधन झालंय. आम्हाला त्याचं दुःख आहे. पण हे हसत आहेत. तिच्या वडिलांनी अशाप्रकारे जाहीर तमाशा करावा हे त्या मुलीचं दुर्दैवं आहे की असा बाप मिळाला. सीबीआय तपास करतंय ना, तपास करू द्या. कोर्टाच्या सुचनांचं पालन व्हायला पाहिजे', अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.