Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना वाद भोवला; दोघांची बदली

पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना वाद भोवला; दोघांची बदली

श्रीगोंदा : खरा पंचनामा 

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेला वाद चांगलाच भोवला आहे. या वादानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे आपली बाजू मांडली होती. त्याबाबाबतचा अहवाला पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालाच्या आधारे पोलिस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात असताना पोलिस कॉन्स्टेबल संदीप राऊत आणि पोलिस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाबाबत पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. उपअधीक्षकांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठवला.

पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारत पोलीस ठाण्यातच वाद घालणे हे शिस्तीला धरून नाही. असे स्पष्ट करत दोन्ही कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदलीचे आदेश पारित केले आहेत. पोलिस कॉन्स्टेबल संदीप राऊत यांची आश्वी पोलिस ठाण्यात तर पोलिस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे यांची आरसीपी (दंगल नियंत्रण पथक) श्रीरामपूर येथे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.