Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणः प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला यांचं निलंबन, IIT बॉम्बेची मोठी कारवाई

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणः प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला यांचं निलंबन, IIT बॉम्बेची मोठी कारवाई

मुंबई : खरा पंचनामा 

साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सूर्यनारायण डुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साहिलच्या मृत्यूप्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे.

मुंबईतील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या यवतमाळच्या साहिल रवींद्र वाकोडे या विद्यार्थ्याने शुक्रवारी संध्याकाळी हॉस्टेलच्या रूममध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबई आयआयटीमध्ये साहिल एनर्जी इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होता. शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी परीक्षेदरम्यान साहिल मोबाईलवर चॅट जीपीटीचा वापर करताना आढळल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात त्याच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर साहिलने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती.

विविध सामाजिक संघटनांकडून साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी प्राध्यापक डुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर पोलिसांनी डुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई आयआयटीने डुल्ला यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. पुढच्या काहीच मिनिटात अधिकृतरित्या जाहीर होईल. डिनशिपवरून त्यांचे निलंबन झाले.

कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारानंतर शिक्षक आणि विभाग प्रमुखांनी साहिलशी चर्चा केली होती. या चुकीचा त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही, असा दिलासाही त्याला देण्यात आला होता. दुपारी ४ वाजता परीक्षा संपल्यानंतर साहिल हॉस्टेलवरील आपल्या खोलीत परतला. मात्र, सायंकाळी तो बाहेर आला नाही. तसेच खोलीतून प्रतिसादही मिळत नसल्याने त्याच्या मित्रांनी ही बाब होस्टेल प्रशासनाला सांगितली. पोलिसांनी दार तोडून होस्टेलमध्ये प्रवेश केला, तेव्हा साहिल मृतावस्थेत होता.

आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यवतमाळ याचा वसतिगृहात मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांनी थेट आरोप केला आहे की मृत्यूपूर्वी साहिलला संस्थेकडून सातत्याने छळले जात होते आणि जातीय भेदभावाला सामोरे जावे लागत होते. पालकांच्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.