Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'होड्यांचं गाव' माहितीपटाला इंटरनॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार

'होड्यांचं गाव' माहितीपटाला इंटरनॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार

पूजा फडके 
पुणे : खरा पंचनामा 

पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि परभन्ना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'इंटरनॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०२६' मध्ये 'होड्यांचं गाव' या माहितीपटाने घवघवीत यश संपादन केले आहे. या महोत्सवात 'होड्यांचं गाव' या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट (सेकंड रनर अप) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे आणि अभिनेत्री तथा दिग्दर्शक वैशाली केंदळे यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार टीमला प्रदान करण्यात आला.
या माहितीपटाचे प्रभावी दिग्दर्शन विक्रम मारुती शिरतोडे यांनी केले असून, सचिन बजरंग ठाणेकर यांनी या कलाकृतीची निर्मिती केली आहे. तसेच विशाल मारुती शिरतोडे यांनी कार्यकारी निर्माता (एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर) म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या माहितीपटाच्या तांत्रिक आणि कलात्मक बाजू भक्कम करण्यात संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा राहिला आहे. माहितीपटासाठी विशाल पांढरे यांनी छायांकन (सिनेमॅटोग्राफी), प्रताप जोशी यांनी संकलन व डीआय (एडिट अँड डीआय), तर प्रणव मोहिते यांनी ध्वनी संयोजनाचे (साउंड) काम उत्कृष्टपणे पार पाडले आहे.

याशिवाय राजकुमार पाटोळे यांनी प्रॉडक्शन मॅनेजर, अभिलाषा कुलकर्णी यांनी सबटायटल्स आणि श्रीपाद मिरजकर यांनी पब्लिसिटी डिझाईनची जबाबदारी सांभाळली. या प्रकल्पासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे आणि गणेश राजकुमार धोत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या बहुमानाबद्दल 'होड्यांचं गाव'च्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत असून सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.