Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

३०.८५ लाखांच्या बेकायदेशीर मद्यासह दोन जण अटकेतठाणे येथे राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई

३०.८५ लाखांच्या बेकायदेशीर मद्यासह दोन जण अटकेत
ठाणे येथे राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

गणेशोत्सव व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे-१ भरारी पथकाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे.

 गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे २६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे पावणेसहा वाजता घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेलसमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पीकअप वाहनाला (क्रमांक DD-01-H-9961) थांबवून तपासणी करण्यात आली.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा आणि नगर हवेली व दीव-दमण येथेच विक्रीसाठी परवानगी असलेला विदेशी मद्य आणि बिअरचा साठा बेकायदेशीरपणे वाहून नेला जात असल्याचे उघड झाले. पथकाने वाहनातून निरनिराळ्या ब्रँडच्या सिलबंद बाटल्या असलेले एकूण २०७ पुठ्ठ्याचे बॉक्स जप्त केले. या कारवाईत वाहनासह ३०,८५,८१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी वाहनचालक बालूसिंह देवीसिंह सिसोदीया आणि रितेश मोहन पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदिप पवार, अधीक्षक प्रविण तांबे, उपअधीक्षक आनंद पवार व उपअधीक्षक रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ, बी. जी. थोरात, जवान एम. एस. कदम, पी. एस. नागरे, व्ही. के. पाटील, महिला जवान एस. एस. यादव, पी. पी. पाटील आणि वाहनचालक आर. बी. तारू सहभागी होते. या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.