Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'भाजपकडून निवडणूक लढा, केंद्रीय मंत्री व्हाल....' ज्ञानेश कुमारांची तत्कालिन मुख्य सचिवांना विमानामध्येच सत्ताधारी पक्षाची ऑफर

'भाजपकडून निवडणूक लढा, केंद्रीय मंत्री व्हाल....' ज्ञानेश कुमारांची तत्कालिन मुख्य सचिवांना विमानामध्येच सत्ताधारी पक्षाची ऑफर

दिल्ली : खरा पंचनामा 

निवडणूक आयोगातील बेबंदशाहीवरून गल्ली ते दिल्ली ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत घेरलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

केरळच्या माजी माजी मुख्य सचिवांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बनण्याची ऑफर दिली होती, असा सनसनाटी दावा केला आहे. निवृत्त आयएएस अधिकारी जिजी थॉमसन यांनी हा खुलासा केला आहे, ज्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांवर (CEC) भाजपशी साटेलोटे असल्याचा जो आरोप केला जातो, त्याला आता अधिक बळकटी मिळाली आहे. थॉमसन यांनी सांगितले की, 2016 मध्ये ते केरळचे मुख्य सचिव असताना कुमार यांनी ही ऑफर दिली होती.

जिजी थॉमसन यांनी सांगितले की, "2016 मध्ये एका विमान प्रवासादरम्यान कुमार यांनी ही ऑफर दिली होती. त्या वर्षी मी सेवेतून निवृत्त होणार होतो. माझ्या भविष्यातील योजनांबद्दल विचारणा केल्यानंतर, कुमार यांनी सुचवले की मी केरळमधून भाजपचा उमेदवार म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवू शकतो. त्यांनी असेही म्हटले की मी केंद्रीय मंत्रीही होऊ शकतो. मला त्यात रस नसल्यामुळे मी ती ऑफर नाकारली. विशेष म्हणजे, ही ऑफर कोणत्याही भाजप नेत्याकडून न येता एका कार्यरत आयएएस अधिकाऱ्याकडून आली होती, ही बाब आश्चर्यकारक होती," असे थॉमसन म्हणाले. सेवेमध्ये थॉमसन यांच्यापेक्षा खूप कनिष्ठ असलेले कुमार त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करत होते, असे थॉमसन यांनी सांगितले.

जिजी थॉमसन आणि ज्ञानेश कुमार दोघेही केरळ केडरचे अधिकारी होते. थॉमसन हे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते, तर कुमार हे 1988 च्या बॅचचे अधिकारी होते. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सुरुवातीला भाजपने कुमार यांचा वापर पक्षासाठी भरती करण्यासाठी केला आणि त्यांनाच 'पंच' केलं.

राहुल यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सुरुवातीला, ज्ञानेश कुमार जे तेव्हा कार्यरत आयएएस अधिकारी होते तेव्हा यांचा वापर भाजपसाठी भरती करण्यासाठी केला गेला. त्यानंतर मोदी आणि शहा यांनी त्यांना 'पंच' केलं आणि भारताच्या निवडणुकांमध्ये 'मॅच फिक्सिंग' करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली."

यापूर्वी, माजी अर्थमंत्री आणि सीपीआय (एम) नेते थॉमस आयॉक यांनी आरोप केला होता की, केरळमधील रस्ते बांधणी प्रकल्पात सहभागी असलेल्या एका मलेशियन कंपनीच्या अधिकाऱ्याने 2006 मध्ये आत्महत्या केली होती आणि त्याने आपल्या आत्महत्येच्या चिठ्ठीत ज्ञानेश कुमार यांचे नाव घेतले होते; कुमार त्यावेळी केरळमध्ये सार्वजनिक बांधकाम सचिव होते. त्या विभागात भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले होते आणि त्यानंतर कुमार यांची बदली करण्यात आली होती, असे आयझेंक यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.