लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले
मुंबई : खरा पंचनामा
लंडन येथील प्रसिद्ध हिथ्रो विमानतळावर अचानक झालेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मोठा बोजवारा उडाला आहे. या सायबर हल्ल्यामुळे सर्वच विमानांची उड्डाणे सुमारे १० ते १२ तास उशिराने सुरू आहेत. या तांत्रिक गोंधळाचा थेट फटका एका पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला गेलेल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बसला आहे.
ब्रिटनमध्ये एअर ट्रॅफिक सिस्टीम फेल झाल्यानं उड्डाणे १० ते १२ तास उशिरानं सुरू आहेत. याचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बसला आहे. एकनाथ शिंदेंचे OSD आणि फोटोग्राफर यांची फ्लाईट डायव्हर्ट झाली आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांचे विमान हिथ्रोऐवजी झुरिककडे डायव्हर्ट करण्यात आल्याने ६ अधिकारी इयुरिकामध्येच अडकल्याची माहिती मिळाली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ब्रिटिश एयरवेजचा विमानात असून त्यांची फ्लाईट वेळेत असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी (OSD) आणि फोटोग्राफर यांच्यासह एकूण ६ अधिकाऱ्यांच्या विमानाचे लँडिंग हिथ्रो विमानतळावर होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे विमान तातडीने स्वित्झर्लंडमधील झ्युरिक (Zurich) येथे डायव्हर्ट करण्यात आले. परिणामी उपमुख्यमंत्र्यांचे सर्व सहा अधिकारी सध्या झ्युरिकमध्येच अडकून पडले आहेत. लंडनमध्ये सध्या सकाळचे साडेपाच वाजले असून, तेथील स्थानिक प्रशासनाकडून या सर्व अधिकाऱ्यांना पहाटे सातच्या सुमारास लंडनला आणण्याची विशेष सोय केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
युके (UK) मधील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यंत्रणेत अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवेचा मोठा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ब्रिटनसह जगभरातील हवाई वाहतुकीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. 'NATS' या ब्रिटनच्या मुख्य एअर ट्रॅफिक कंट्रोल संस्थेच्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने युकेमधील १५ हून अधिक प्रमुख विमानतळांवर विमानांची उड्डाणे ठप्प झाली आहेत. यामुळे आतापर्यंत १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी विविध विमानतळांवर ताटकळत अडकून पडले आहेत. या अभूतपूर्व गोंधळामुळे आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल NATS प्रशासनाने अधिकृतपणे माफी मागितली असून, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.