Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"खाई त्याला खवखवे" म्हणत राज ठाकरेंचा भाजपाला टोला, निवडणूक आयोगाविरोधातल्या मोर्चाबाबत दिली माहिती

"खाई त्याला खवखवे" म्हणत राज ठाकरेंचा भाजपाला टोला, निवडणूक आयोगाविरोधातल्या मोर्चाबाबत दिली माहिती

मुंबई : खरा पंचनामा 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा ४ ऑक्टोबरला निघणार आहे. हा मोर्चा भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास कंपनी ते मुंबई महापालिका इथपर्यंत निघणार आहे.

सकाळी १० वाजता मोर्चाला सुरूवात होईल. त्यानंतर ११ ते ११.३० च्या दरम्यान मुंबई महापालिकेच्या जवळ या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे.

निवडणूक आयुक्तांबाबत जे काही सांगितलं जातं आहे ते कपोलकल्पित आहे असं भाजपाने म्हटलं आहे. दरम्यान याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता राज ठाकरे म्हणाले आम्ही जर का निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत असू तर मग भाजपाला काय त्रास होतो आहे? मराठीत एक म्हण आहे खाई त्याला खवखवे असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे. तसंच मोर्चाच्या दिवशी इतर कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल. तिरंगा घेऊन आम्ही सगळे मोर्चात सहभागी होऊ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.