Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

SIR वादादरम्यान राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचाही सवाल, निवडणूक आयोगाला थेट पत्र

SIR वादादरम्यान राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचाही सवाल, निवडणूक आयोगाला थेट पत्र

मुंबई : खरा पंचनामा 

देशात मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेवरून (SIR) रणकंदन सुरू आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानंतर देशातील विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रविवारच्या आंदोलनाविषयी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. दरम्यान त्याचवेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट पत्र धाडलं आहे. त्यांनी पत्रातून काय काय मागणी केली आहे?

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मतदार याद्यांच्या पडताळणी प्रक्रियेत स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे (ERO) अधिकार पूर्ववत करावेत. सोबतच 'ECINet' सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते महत्त्वाचे बदल करण्यात यावेत अशी मागणी या पत्रातून केली आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांचे अधिकार सॉफ्टवेअरमुळे सीमित झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. कायदेशीररीत्या अधिकाऱ्यांना असलेले अधिकार वापरता यावेत, यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.

राज्यात मतदारयादी विशेष सखोल तपासणीअंतर्गत शनिवार-रविवारी विशेष शिबिर राबवण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी ही माहिती दिली आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता आणि नोंदणीतील त्रुटी दुरुस्त करण्याची सुविधा मिळणार आहे. राज्यातील १ लाख ३०० मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबवली जात आहे. मुंबईतील १० हजार मतदान केंद्रांवरही शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.