Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार" आमदार-खासदार विकत घेतल्यानंतर स्वतःच स्वतःला पुरस्कार विकत घेत आहेत; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

"हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार" 
आमदार-खासदार विकत घेतल्यानंतर स्वतःच स्वतःला पुरस्कार विकत घेत आहेत; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

पुरस्कार श्री, स्वतःच स्वतःला पुरस्कार घेत आहेत. आमदार-खासदार तर विकत घेत आहेत, पुरस्कार पण विकत घेत आहेत, आपल्याला सांगतील, "ये तुमसे ना हो पाएगा, हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार" म्हणजे ते उलट आपल्याला सांगतील, "जो हमने किया, पुरस्कार खरीद लिया, ये तुमसे ना हो पाएगा!" जे स्वतःच्या विकासासाठी तिकडे गेलेत, मराठवाड्याच्या विकासाचं नाव घेऊन, त्यांनी हिम्मत असेल, तर मराठवाड्याच्या व्यथा छातीठोकपणे पंतप्रधानांच्या समोर मांडू शकता का? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाड्यासाठी झालेल्या अन्यायावर, अन्यायाबद्दल जे काही तुम्ही वाचा फोडत आहात, तुम्हाला सगळ्यांना आपले दयाळू पंतप्रधान माफ केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे कर्जमाफी नाही करणार, पण तुम्ही न्याय हक्कासाठी उठवलेल्या आवाजाबद्दल तुम्हाला ते नक्की माफ करतील. उद्धव ठाकरे म्हणाले की, ते नुसते बोर्ड बघून मी गेलो, मला असं वाटलं की, मराठवाड्यात तर काय आनंदी आनंदच आहे. इकडे दुष्काळ कुठे? इकडे तर दुधाचा पाऊस पडत असेल, पण जमिनीवर काय आहे? हा मुद्दा कोणाच्याच लक्षात येत नाही.

त्यांनी सांगितले की, आज जाहिराती बघितल्या त्या जाहिरातीचा खर्च तुम्ही मराठवाड्याला द्यायला पाहिजे होतं. हे गरीब शेतकऱ्याचा पोरग हेलिकॉप्टरने आपल्या शेतीत जातं आणि परदेशात जाऊन पुरस्कार विकत घेत आहे. कर्नाटकमध्ये दुष्काळ जाहीर केला आणि आम्ही पंचाग बघून सगळे करतो. पंचांग बघून 5 ऑक्टोबरचा मुहूर्त आहे बरे? तोपर्यंत किती शेतकरी जीव देतील, कसला मुहूर्त बघताय? अशी विचारणा त्यांनी केली. शेतकरी आत्महत्येला सरकार जबाबदार आहे त्यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.