मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कमान कोसळून ९ कामगार गंभीर जखमी; कंत्राटदारावर गुन्हा दाखल
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात निर्माणाधीन कमानीचा बीम कोसळून ९ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात मिनरुल शेख, सियाराम चौधरी, कादर शेख, अरविंद कुमार चौधरी, आमीनसुर मलीक, राखीरमुल शेख, साहेब शेख, हसमतअली शेख व गाबबहार शेख हे मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
या कामात कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी न घेता अत्याधुनिक व सुरक्षित साहित्याऐवजी कमकुवत लाकडी व पोकळ बांबू तसेच फळ्यांचा वापर केला होता. कंत्राटदाराच्या या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळेच कमानीचा वरील बीम कोसळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस ज्ञानदेव डांगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२५, १२५(अ) व १२५(ब) नुसार गुन्हा (CCTNS गुरनं. ३००/२०२६) दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.