Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

६२० पैकी १५० अधिकारी अजूनही मंत्र्यांकडे; शिंदे कार्यालयाकडून ३० कर्मचारी सोडण्यास नकार? उसनवारीवरील अधिकारी अजूनही मंत्रालयातच

६२० पैकी १५० अधिकारी अजूनही मंत्र्यांकडे; शिंदे कार्यालयाकडून ३० कर्मचारी सोडण्यास नकार? उसनवारीवरील अधिकारी अजूनही मंत्रालयातच

मुंबई : खरा पंचनामा 

तोंडी आणि उसनवारी तत्त्वावर मंत्र्यांकडे कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ विभागात पाठविण्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशाला महिना लोटल्यानंतरही एक तृतीयांश अधिकारी अजूनही सबंधित मंत्र्याकडे तळ ठोकून बसल्याचे आढळून आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांना रिक्त जागांवर समायोजित करण्याची मागणी केली आहे.

उसनवारी पद्धतीने आणि तोंडी आदेशाने मंत्री आस्थापनेला चिकटून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याबाबत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी २५ ऑगस्ट रोजी आदेश काढले होते. त्यानुसार विविध मंत्र्यांकडे उसनवारीवर काम करणाऱ्या ६२० अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १५० अधिकारी कर्मचारी अजूनही मंत्र्यांकडे कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे काही बहुतांश मंत्र्यांनी आपल्याकडील कर्मचारी कमी केले असले तरी अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी ७२ पदे मंजूर असून त्यांच्याकडे ३० अतिरिक्त कर्मचारी कार्यरत असून यातील एकही कर्मचारी सोडण्यास शिंदे यांच्या कार्यालयाने नकार दिल्याचे समजते. उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी मंजूर पदांपैकी १८ पदे रिक्त असून त्यावर पदांवर या अधिकाऱ्यांना समायोजित करण्याची मागणी उपमुख्यमंत्री कार्यालयाने केली आहे. त्यानुसार धोरणात बसणाऱ्या अधिकाऱ्यांचे समोयोजन केले जाणार असून अन्य कर्मचाऱ्यांना परत पाठवावे लागणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या कार्यालयात केवळ दोन अतिरिक्त कर्मचारी आढळून आले. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या कार्यालयासाठी १६ पदांची मंजूरी असताना तेथे तब्बल ७० अधिकारी कर्मचारी उसनवारीवर काम करीत असल्याचे आढळून आले असून त्यांना परत पाठविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.