Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्मवीर पतसंस्थेतील मतभेद मिटलेअध्यक्षा भारती चोपडे व उपाध्यक्ष ॲड. एस. पी. मगदूम यांच्याकडून राजीनामे मागे, ठेवी सुरक्षित असल्याची ग्वाही

कर्मवीर पतसंस्थेतील मतभेद मिटले
अध्यक्षा भारती चोपडे व उपाध्यक्ष ॲड. एस. पी. मगदूम यांच्याकडून राजीनामे मागे, ठेवी सुरक्षित असल्याची ग्वाही

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

कर्मवीर पतसंस्थेतील संचालक मंडळात निर्माण झालेले तात्विक मतभेद सर्व संचालकांनी एकत्र येत बैठकीद्वारे सौहार्दपूर्ण वातावरणात मिटवले आहेत. या सकारात्मक घडामोडीनंतर पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस. पी. मगदूम यांनी दिलेले राजीनामे मागे घेतले असून, संस्थेचे पुढील कामकाज वेगाने व सुरळीतपणे सुरु करण्यात आले आहे.

संस्थेतील सर्व ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही ठेवीदाराने काळजी करू नये, अशी ग्वाही संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांना देण्यात आली आहे.

पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे आणि माजी अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संयुक्तपणे आवाहन करताना स्पष्ट केले की, संस्थेच्या प्रगतीसाठी व हितासाठी सर्व आजी-माजी संचालकांनी एकत्र येऊन काम करण्याचा ठाम निर्धार केला आहे. गेल्या ३८ वर्षांपासून कर्मवीर पतसंस्था एकात्मतेने, निष्ठेने आणि सभासदांच्या विश्वासावर यशस्वी वाटचाल करत आहे. हीच उज्ज्वल परंपरा कायम राखत सर्वांच्या सहकार्याने संस्था अधिक उंचावर नेण्याचे अभिवचन सर्व संचालक मंडळाने दिले आहे.

राजीनामे मागे घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पुढील प्रशासकीय व व्यावसायिक व्यवहार नियमितपणे पार पाडण्याचे ठरले. पतसंस्थेची स्थिती भक्कम असून ठेवीदारांचे हित जपण्यास संस्था सदैव कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व सभासद व ठेवीदारांनी या सर्व घडामोडींची अधिकृत नोंद घ्यावी, असे आवाहन पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.