तासगाव तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात
शंभरहून अधिक खेळाडूंचा सहभाग; विविध वजन गटांत उल्लेखनीय कामगिरी
पूजा फडके
तासगाव : खरा पंचनामा
पाडळी (ता. तासगाव) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली, तासगाव तालुका क्रीडा परिषद आणि संत ज्ञानेश्वर विद्यालय, विद्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तासगाव तालुकास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तालुक्यातील विविध शाळांमधील शंभरहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन विसापूर केंद्रप्रमुख अमोल कोठीवाले, चेअरमन बाजीराव सुर्वे, गलाई उद्योजक नामदेव पाटील आणि उपसरपंच अजित पाटील यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे पूजन करून करण्यात आले.
१४ वर्षांखालील गटात ३५ किलो वजन गटात राजवर्धन फाळके (वायफळे) व मुहम्मदसाद जमादार (बोरगाव), ३८ किलो गटात अनिकेत वंजारी (सिद्धेवाडी) व संचित पाटील (तासगाव), ४१ किलो गटात श्रीशैल्य पाटील (सावळज) व वरद सावंत (तासगाव), ४४ किलो गटात अनुभव चव्हाण (सिद्धेवाडी) व प्रेम पवार (कुमठे), ४८ किलो गटात प्रज्वल पाटील (कवठेएकंद), ५२ किलो गटात वेदांत माळी (मणेराजुरी) व प्रबुद्ध कांबळे (वायफळे), ५७ किलो गटात आरुष पाटील व हर्षवर्धन पाटील (लक्ष्य अकॅडमी), ६२ किलो गटात आयुष शिंदे (संत ज्ञानेश्वर विद्यालय) व सोहम साळुंखे, ६८ किलो गटात आयुष जाधव (गव्हाण), तर ७५ किलो गटात गणेश माळी (लक्ष्य अकॅडमी) यांनी यश संपादन केले. मुलींच्या ४२ किलो गटात भूमी माने (तासगाव), तर ५० किलो गटात आरोही धेंडे विजयी ठरल्या.
१७ वर्षांखालील गटातही चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. ४५ किलो गटात समर्थ पाटील (कुमठे) व अमेय पवार (मणेराजुरी), ४८ किलो गटात वेदांत सुर्वे (संत ज्ञानेश्वर विद्यालय) व दर्शन पाटील, ५१ किलो गटात आदित्य गुजले (उपळावी) व सुजल कांबळे (मांजर्डे), ५५ किलो गटात हर्षवर्धन जाधव (कुमठे) व संग्राम लवटे (लक्ष्य अकॅडमी), ६० किलो गटात यश कोळेकर (लक्ष्य अकॅडमी) व विराज पाटील (कवठेएकंद), ६५ किलो गटात समर्थ इंगोले (लक्ष्य अकॅडमी) व भालचंद्र वाघमोडे (चिंचणी), ७१ किलो गटात गौरव वाडेकर (सावळज) व रोहित माने-पाटील (मणेराजुरी), ८० किलो गटात अर्जुन खडतरे (लक्ष्य मणेराजुरी) व आयुष सावंत (कवठेएकंद), ९२ किलो गटात अभिषेक चव्हाण (सिद्धेवाडी) व पृथ्वीराज पाटील (संत ज्ञानेश्वर विद्यालय), तर ११० किलो गटात समर्थ कवाळे (मणेराजुरी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
ग्रीको प्रकारात विराज पाटील (मांजर्डे), श्रेयश धनवडे, अथर्व पाटील (लक्ष्य अकॅडमी), श्रेयश जाधव (तासगाव), आदेश पाटील, प्रतीक पवार (तासगाव), तेजस माळी, हर्षद पाटील (मणेराजुरी), सार्थक चव्हाण (तासगाव), प्रथमेश चौगुले (लक्ष्य मणेराजुरी), विठ्ठल कदम (मणेराजुरी) आणि विराज पाटील (लक्ष्य मणेराजुरी) यांनी विजय मिळवला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ४३ किलोमध्ये यशवंती मंडले (सिद्धेवाडी), ४६ किलोमध्ये दिव्यानी जाधव (सिद्धेवाडी), तर ६९ किलो गटात नूतन माने (संत ज्ञानेश्वर विद्यालय) विजयी ठरल्या.
१९ वर्षांखालील गटात ५७ किलोमध्ये दीपक मंडले (तासगाव) व ऋतुराज साळुंखे (मणेराजुरी), ६१ किलोमध्ये शुभम जाधव व आदित्य पाटील (मणेराजुरी), ७० किलोमध्ये पियुष पाटील व श्रवण माळी, ७४ किलोमध्ये वरद औताडे (लक्ष्य मणेराजुरी), ७९ किलोमध्ये अनिकेत मगदूम (लक्ष्य मणेराजुरी), ९२ किलोमध्ये समर्थ जळेकर आणि ९७ किलोमध्ये राजकुमार पाटील (तासगाव) यांनी यश मिळवले. ग्रीको प्रकारात लक्ष्य अकॅडमीच्या परशराम माळी, अतुल साळुंखे, विराज जगदाळे, अथर्व माळी, आदित्य साळुंखे, संदीप माळी आणि ओमकार भोसले यांनी यश संपादन केले. मुलींच्या गटात शरणम्मा हळदे (पेड) व दिव्यानी पाटील (संत ज्ञानेश्वर विद्यालय) यांनी विजय मिळवला.
स्पर्धेला उदगीर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सूर्यकांत पाटील, केंद्रप्रमुख अमोल कोठीवाले, एस. एस. नायकल, शरद शिंदे, प्रवीण सपकाळ यांच्यासह तासगाव तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंच म्हणून दादासाहेब जाधव आणि सुशांत जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचालन व नियोजन के. पी. पाटील आणि निशिकांत पाटील यांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.