Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीवर शरद पवारांचे भाष्य, पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार पवार काय म्हणाले?

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीवर शरद पवारांचे भाष्य, पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार पवार काय म्हणाले?

पुणे : खरा पंचनामा 

शरद पवार यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य करण्यास नकार देताना, "निकाल येईपर्यंत भाष्य करणं दोघांच्या हिताचं नाही," असं म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये बारामतीला येण्याची शक्यता असून, १६ ऑक्टोबरची तारीख संभाव्य असल्याची माहितीही पवारांनी दिली.

शरद पवार यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. "कोर्टाचा निकाल येईल. सुनावणी सुरू आहे, संपलेली नाही. त्याआधी भाष्य करणं दोघांच्या हिताचं नाही. काय असेल ते कळेल," असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात बारामती दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान येणार आहेत, पण तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. १६ ऑक्टोबरला ते येण्याची शक्यता आहे." यावेळी बारामतीतील काही प्रकल्पांबाबत पंतप्रधानांना प्रेझेंटेशन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

साखरेच्या वाढलेल्या दरांबाबतही पवारांनी चिंता व्यक्त केली. साखरेचे दर वाढले असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचं त्यांनी म्हटलं. उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य हिस्सा मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच साखर आयात करण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं पवारांनी सांगितलं. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.