Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंनी व्यक्त केली मोठी भीती; म्हणाले, 'पोरं जातील...'

गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंनी व्यक्त केली मोठी भीती; म्हणाले, 'पोरं जातील...'

ठाणे : खरा पंचनामा 

'14 तारखेला गणपती येत आहेत. मला सर्वात जास्त भीती आहे की, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील, फक्त महाराष्ट्रात नाही म्हणत मी देशभरात. जेणेकरून तुम्ही त्याच्यात अडकले पाहिजे, बाकीच्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे.', अशी भीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ठाण्यात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, 'एक दोन घटना घडल्या ही सुरुवात आहे. जो सुजाण हिंदू आहे, जो सुजाण मुस्लिम आहे, त्या दोघांनाही मला सांगायचे आहे की सतर्क राहा, आपल्या नावाने त्यांच्या नावाने कोणतरी घुसवतील हकनाक आपली पोरं जातील, त्यांची पोरं जातील. मुळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे, हा त्यांचा हेतू आहे. कारण देशाची परिस्थिती आता अत्यंत वाईट आहे.

प्रत्येकाने आपआपला धर्म पाळावा, आपआपला परमेश्वर पाळावा, त्याची पुजा करावी, त्याचे स्तोम माजवले जात आहे. डीजे वाजवायचा नाय वाजवायचा यावर मुख्यमंत्री काय बोलले हे मला अजून कळलं नाही, असा टोला ही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

'धर्माची गुंगी आणायची, जातीयतेच्या गुंगीत आडकवायचं, बाकीच्या गोष्टी करायला हे सगळे जण मोकळे, आम्ही जंगल देतोय, जंगल तोडतोय, मुंबई, पुण्यातील जमीन अदानीला देतोय, जमीन कोण घेतोय याकडे लक्ष नाही, एसआयआरकडे लक्ष नाही, मग तुम्हाला या सगळ्या गोष्टीत गुंतवायचे सुरू आहे.', असे देखील ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.