कोल्हापूर विभागीय वुशू स्पर्धेत 'किड्स पॅराडाईज'च्या विद्यार्थ्यांचे यश
राशी पवारला रौप्य, तर गनी मुरसलला कांस्यपदक
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
रत्नागिरी येथे पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय वुशू क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी संचलित किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर देदीप्यमान यश संपादन केले आहे. या विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विद्यार्थ्यांनी रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई करून शाळा व सांगली जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना १९ वर्षे वयोगट व ६० ते ६५ किलो वजनी गटात कु. राशी पवार हिने आपल्या कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळवले. तसेच १७ वर्षे वयोगटात कु. गनी मुरसल याने उत्कृष्ट लढत देत तृतीय क्रमांकासह कांस्यपदकावर आपले नाव कोरले. दोन्ही खेळाडूंनी दाखवलेले सातत्य, मेहनत आणि शिस्त यामुळेच हे यश शक्य झाले आहे. या विशेष यशाबद्दल शाळेत दोन्ही खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन शिक्षणमहर्षी प्रा. आर. एस. चोपडे, शाळेच्या व्यवस्थापिका डॉ. सौ. मानसी सोनलकर आणि मुख्याध्यापिका सौ. दिपाली थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 'कमिटमेंट टू एक्सलन्स' या शाळेच्या ध्येयवाक्याला सार्थ ठरवत यश मिळवणाऱ्या या दोन्ही युवा चॅम्पियन्सवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.