Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

कोलकाता : खरा पंचनामा 

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यावरून देशात राजकीय वाद सुरू असतानाच पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र व शांततापूर्ण निवडणुका घेण्यासह मतदार यादी दुरुस्त करण्याच्या कामात ज्ञानेश कुमार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा त्यांनी केला. त्यासाठी ज्ञानेश कुमार यांना किमान पद्मभूषण, तर काही वेळा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा, असे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.

'काँग्रेस राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही. मग त्यांच्या वक्तव्यांवर चर्चा कशाला? ज्ञानेश कुमार यांना किमान पद्मविभूषण द्यायला हवे. पश्चिम बंगालमधील जनता आनंदी आहे. अनेक वर्षांनंतर भीती आणि दबावाच्या वातावरणातून बाहेर पडून लोकांना कोणत्याही हत्येच्या घटनेशिवाय मतदानाची संधी मिळाली,' असे भट्टाचार्य म्हणाले.

पश्चिम बंगाल हे सीमावर्ती राज्य असून मतदार यादीतील बांगलादेशी घुसखोरांची नावे वगळण्याचे काम ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचा दावाही त्यांनी केला. बंगालच्या जनतेचा आशीर्वाद ज्ञानेश कुमार यांच्यासोबत असून त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याची भाजपची इच्छा असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.

दरम्यान, विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, निवडणूक आयोगाचे अन्य दोन आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयांवर गेल्या दहा महिन्यांत अनेकदा असहमती नोंदवली. दोन्ही आयुक्तांनी किमान १४ वेळा लेखी असहमती व्यक्त केल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन सरकारी साक्षीदार व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

देशातील निवडणूक व्यवस्था आणि लोकशाही संस्थांना नुकसान पोहोचवले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. एसआयआरदरम्यान मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे किंवा वगळणे याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मतदानाची किंवा वगळणे याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मतदानाची व्यवस्था कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम संविधान आणि लोकशाही संस्थांवर होतो, असा दावा गांधी यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.