Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुजरातमधून महाराष्ट्रात बनावट खवा; ट्रॅव्हल्समधून अस्वच्छ वाहतूक; तुकाराम मुंढेंच्या 'एफडीए'ने केला लाखोंचा हजारो किलो खवा जप्त

गुजरातमधून महाराष्ट्रात बनावट खवा; ट्रॅव्हल्समधून अस्वच्छ वाहतूक; तुकाराम मुंढेंच्या 'एफडीए'ने केला लाखोंचा हजारो किलो खवा जप्त 

अकोला : खरा पंचनामा 

गुजरातमधून महाराष्ट्रात खव्याची अस्वच्छ वातावरणात वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे बनावट खवा देखील आढळून आला आहे. तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनने कारवाई करून लाखो रुपयांचा हजारो किलो खवा जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली असून खव्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह लागले.

सणासुदीचा काळ म्हटलं की खाण्यापिण्याची चंगळ. या सणाच्या काळात खासकरुन गोड पदार्थांचे महत्व खूप असते. वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ केल्या जातात. बहुतांश पदार्थात खवा हा असतो. दूधापासून बनवला जात असलेल्या खव्याची मागणी सणासुदीत मोठ्या प्रमाणावर वाढते आणि मग सुरु होतो, भेसळीचा खेळ. भेसळयुक्त खव्याने गोड पदार्थ महागात पडू शकतात. सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

अकोला अन्न व औषध प्रशासनाना शहरातील निमवाडी परिसरात एका खासगी बसच्या डिक्कीमधून बनावट खवा गुजरातमधून आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून छापा टाकला. खवा अस्वच्छ वातावरणात वाहतूक केल्यामुळे पाच अन्न नमुने घेऊन जप्त करण्यात आले. सिंधी कॉलनीमधील एका गोदामामधून १२० किलो बनावट खवा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने १२ लाख ९४ हजार ३०० रुपये किमतीचा एकूण १०९७ किलो बनावट खव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच यासंबंधी चौकशी केली असता बिलावरुन वैभव गणेशराव मोडक (पाटील), पीयूष नागवाणी, कमल शर्मा, संदिप निरंकारी आदी व्यापाऱ्यांनी हा खवा मागविल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई अमरावती विभागाचे सहआयुक्त (अन्न) एस. डी. केदारे, सहाय्यक आयुक्त (अन्न) डी. जी. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सोळंके व कि. ह. बोरचाटे यांनी केली.

अन्न व औषध प्रशासनाने जप्त करण्यात आलेला अन्न पदार्थ हा अस्वच्छ वातावरणात वाहतुक केल्याने अकोला महानगर पालिकेच्या प्रकल्पात नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) डी. जी. वीर यांनी दिली. सध्या सणासुदीच्या काळात बनावट व भेसळयुक्त अन्न पदार्थांचा धोका वाढला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.