Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विटा येथे ४२ लाख ८२ हजारांचे एमडी ड्रग्ज जप्तसांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

विटा येथे ४२ लाख ८२ हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील विटा ते तासगाव रस्त्यावरील श्री मंगल कार्यालयासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) केलेल्या धडक कारवाईत ३८ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९६५ ग्रॅम 'मेफेड्रॉन' (एमडी) नावाचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत एमडी ड्रग्जसह मारुती सुझुकी अल्टो कार, मोबाईल फोन आणि रिकाम्या कॅप्सूल असा एकूण ४२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि राजेंद्र यादव व पोउपनि महादेव पोवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनावर देखरेख ठेवून सापळा रचला होता. या दरम्यान दत्तातय अंकुश पाखरे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली) याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. वाहनाची आणि आरोपीची झडती घेतली असता प्लॅस्टिकच्या पिशवीत फिकट पिवळसर रंगाची मेफेड्रॉनची पावडर आढळून आली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय तस्करांशी जोडलेले असल्याचे समोर आले आहे. केरळमधील साथीदार अब्दुल निझार मोईद्दीन कुणी उर्फ आदिलखान आणि मोहम्मद शमीर उर्फ समीर यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कतार देशातून आलेल्या प्रवाशांमार्फत हे ड्रग्ज पुरवले होते. आरोपीने या कॅप्सूल फोडून पावडर जमा केली आणि विटा भागात विक्रीसाठी आणली होती. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सांगली पोलीस या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विट्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सांळुखे, एलसीबीचे सहा. पोलीस निरीक्षक राजेद्र यादव, सायबरच्या सहा. पोलीस निरीक्षक, रुपाली बोबडे, एलसीबीचे उप निरीक्षक महादेव पोवार, विट्याचे उप निरीक्षक संग्राम पाटील, संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, संदीप पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, सुशील मस्के, सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, गणेश शिंदे, सुशांत चिले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.