Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात आता कटिंग चहा

एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात आता कटिंग चहा

मुंबई : खरा पंचनामा 

एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये प्रवाशांसाठी मुंबईचा प्रसिद्ध 'कटिंग चहा' देण्याचा निर्णय घेतला आहे. ३५,००० फूट उंचीवर उडणाऱ्या विमानांमध्ये प्रवाशांना तरतरीत राहण्यासाठी आता घरच्या चहाची चव चाखता येणार आहे.

प्रवासादरम्यान येणारा शीण कमी व्हावा तसेच प्रवास अधिक सुखकर वाटावा, या उद्देशाने टाटा समूहाच्या एअर इंडियाने ही खास सेवा सुरू केली आहे.

हा खास मसाला कटिंग चहा आंतरराष्ट्रीय मार्गावरील फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लास कॅबिनमधील प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या या कटिंग चहाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठित 'एअरलाइन पॅसेंजर एक्सपीरियन्स असोसिएशन'चा 'बेस्ट ऑनबोर्ड बेव्हरेज'चा पुरस्कार देखील मिळाला आहे. भारतातील रस्त्यांवरील टपरीवर मिळणाऱ्या कटिंग चहापासून प्रेरित होऊन हा चहा तयार करण्यात आला असून, यामध्ये भारतीय मसाल्यांचा उत्तम स्वाद प्रवाशांना मिळतो, असा दावा करण्यात आला आहे.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केलेला हा मसाला चहा, संपूर्ण भारतात लोकप्रिय असलेल्या स्ट्रीट-स्टाईल कटिंग चहापासून प्रेरित आहे. या मिश्रणात चहा आणि सुगंधी मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे भारतीय प्रवाशांना परिचित असलेली चव तयार होते आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना एका अत्यंत आवडत्या भारतीय परंपरेची चव चाखायला मिळते. टाटा समूहाअंतर्गत एअर इंडिया आपल्या सेवांमध्ये भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा समावेश करून प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे.

कटिंग चहा म्हणजे फक्त एक पेय नाही, तर तो एक भावनिक संवाद आणि कट्टा संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. "कटिंग" म्हणजे पूर्ण कपभर चहा न घेता, एका कपाचे अर्धे (कट) केलेले प्रमाण, जे दोन जण वाटून घेऊ शकतात किंवा एक व्यक्ती कमी वेळात घेते. भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुक्यात रस्त्याच्या कडेला टपरीवरील कटिंग चहा पिताना राजकारण, सिनेमा, क्रीडा आणि दैनंदिन विषयांवर चर्चा रंगतात. प्रवासात येणारा शीण, फ्लाइट दरम्यान वेटींग करताना प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून हा चहाबाज लोकांसाठी हा पर्याय उपलब्ध केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.