Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोवा बनावटीच्या दारूसह रेल्वे अटेंडंटला अटकठाणे रेल्वे स्टेशनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

गोवा बनावटीच्या दारूसह रेल्वे अटेंडंटला अटक
ठाणे रेल्वे स्टेशनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

पूजा फडके 
ठाणे : खरा पंचनामा 

ठाणे रेल्वे स्थानकावर मंगुलुरु एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका रेल्वे अटेंडंटला राज्य उत्पादन शुल्क, ई-विभाग, ठाणे-१ च्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ०८ वर ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून विविध ब्रँडच्या ६१ सिलबंद बाटल्यांसह सुमारे ७९,५६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.  
​गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, परराज्यातील (गोवा निर्मित) मद्याची रेल्वेद्वारे वाहतूक होणार असल्याचे समजल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ठाणे रेल्वे स्टेशनवर विशेष गस्त घातली होती. गाडी क्रमांक १२१३४ मंगुलुरु एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर दोन ट्रान्स कंपनीच्या काळ्या-निळ्या रंगाच्या बॅगा घेऊन उतरणाऱ्या एका संशयित इसमाला पथकाने जागीच थांबवले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शिवम छनबस मठपती असे सांगून तो रेल्वेत परिचारक (अटेंडंट) म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट केले. त्याच्या बॅगांची झाडाझडती घेतली असता त्यात रॉयल चॅलेंज व्हिस्की, ओल्ड मंक कॉफी रम, रॉयल ग्रीन व्हिस्की, ऑक्सस्मिथ सनटोरी व्हिस्की, बकार्डी गावा व्हिस्की, ब्लैक अँड व्हाईट व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, व्हॅट ६९ व्हिस्की आणि ऑक्सस्मिथ गोल्ड व्हिस्की अशा विविध ब्रँड्सचा एकूण ३६.८५ बल्क लिटर साठा आढळून आला.  

​या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) आणि १०८ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी शिवम मठपती याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची एक्साईज कस्टडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदिप पवार, अधीक्षक प्रविण तांबे आणि उप-अधीक्षक रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद अं. पवार, दुय्यम निरीक्षक पी. एम. खरबे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकते, जवान एस. एस. पैठणकर आणि आर. एस. गोलतकर यांनी पार पाडली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक पी. एम. खरबे करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.