Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत एटीएम मशीन पळवणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद१० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त : महाराष्ट्रासह चार राज्यातील अकरा गुन्हे उघड

सांगलीत एटीएम मशीन पळवणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
१० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त : महाराष्ट्रासह चार राज्यातील अकरा गुन्हे उघड 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगलीवाडी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन पैशांसह पळवणाऱ्या एका आंतरराज्यीय सराईत टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी टोळीतील दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चारचाकी गाडी, दोन मोटारसायकल, गॅस कटर आणि रोख रकमेसह एकूण १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बहादुर प्रल्हादराम चौकीदार बावरी (वय ३६) आणि गोपाल तेजाराम बावरी (वय ३४, दोघे रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांचा साथीदार अर्जुन प्रेमाराम मेघवाल हा फरार झाला आहे. या अटकेमुळे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील तब्बल ११ गंभीर गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले आहेत.

दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सांगलीवाडी परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी उचकटून पळवून नेले होते. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळाच्या पाहणीवरून चोरांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते.

तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच पोलिसांनी २७ सप्टेंबर २०२६ रोजी सापळा रचून राजस्थान पासिंगच्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर गाडीसह दोन संशयितांना ताब्यात घेतले.

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम, गॅस सिलेंडर, नोझल, नायलॉनचे दोरखंड आणि चोरीची मोटारसायकल आढळून आली. कडक चौकशीदरम्यान आरोपींनी सांगलीवाडीतील एटीएम मशीन बोलेरो गाडीला दोराने बांधून खेचून उचकटल्याची आणि कसबेडिग्रज रस्त्यावरील उसाच्या शेतात नेऊन गॅस कटरने कापून पैसे काढल्याची कबुली दिली. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी उसाच्या शेतातून एटीएम मशीनचे तुकडे जप्त केले. चौकशीत ही टोळी ज्या परिसरात चोरी करायची, तिथून ५० ते ६० किलोमीटर अंतरावर ग्रामीण भागात खोली भाड्याने घेऊन राहायची. रेकी करण्यासाठी आसपासच्या भागातून दुचाकी चोरी करायची आणि रात्रीच्या वेळी कमी लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या एटीएमला बोलेरो गाडीने दोरखंड बांधून उपटून नेऊन फोडायची, अशी त्यांची गुन्हे करण्याची पद्धत होती.

पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी अत्यंत सराईत गुन्हेगार असून आरोपी बहादुर बावरी याच्यावर ३० पेक्षा जास्त, तर गोपाल बावरी याच्यावर ४० पेक्षा जास्त एटीएम चोरीचे गुन्हे विविध राज्यांत दाखल आहेत. या टोळीवर महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्ली परिसरातही अनेक गुन्हे नोंद आहेत. जप्त मुद्देमालासह दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सुयवंशी, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, संदीप नलावडे, सतिश माने, महादेव नागणे, अमीरशा फकीर, संदीप गुरव, उदय माळी, सोमनाथ पतंगे, विनायक सुतार, विक्रम खोत, सुशांत चिले, गणेश शिंदे, महेश कुंभार, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.