Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिशा सालियनच्या वडिलांनी सीबीआयकडे नोंदवला जबाब

दिशा सालियनच्या वडिलांनी सीबीआयकडे नोंदवला जबाब

मुंबई : खरा पंचनामा 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय तपासाला आता वेग आला असून, दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी शुक्रवारी बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात आपला जबाब नोंदविला. एकमेव सतीश सालियन यांनी आपल्या तक्रारीत दिशा यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला असून, त्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यांच्या वकिलांनी सीबीआयकडे या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची नावे आणि इतर महत्त्वाची माहिती दिल्याचे समजते. वकील निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश सालियन यांच्या जबाबात बलात्कार, हत्या आणि कथित कटकारस्थानासंदर्भातील बाबी मांडण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याच्या कथित कबुलीजबाबाची माहितीही सीबीआयला दिल्याचे ओझा यांनी सांगितले.

२ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने या प्रकरणात एफआयआर नोंदवून वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच सतीश सालियन यांचा जबाब नोंदवावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

न्यायालयाने मात्र तपासात ठोस पुरावे मिळेपर्यंत कोणालाही आरोपी म्हणून संबोधू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तपासात दखलपात्र गुन्हा सिद्ध न झाल्यास सीबीआयने संबंधित न्यायालयात अंतिम अहवाल सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे. दिशा सालियन यांचा जून २०२० मध्ये मालाडमधील इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.