Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'कॉक्रोच जनता पार्टी'चे आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात; अभिजित दिपकेंचा 'अज्ञात स्थळी नेण्यात आल्या'चा दावा !

'कॉक्रोच जनता पार्टी'चे आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात; अभिजित दिपकेंचा 'अज्ञात स्थळी नेण्यात आल्या'चा दावा !

गुवाहाटी : खरा पंचनामा 

आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये रविवारी सकाळी 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ट्विट करत पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले असून, टीमला अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा दावा केला आहे.

रविवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गुवाहाटीतील चौधरी टिळा भागात 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या स्वयंसेवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मेळावा सुरू होण्यापूर्वीच आसाम पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि रस्ते बंद केले. कार्यकर्ते एकत्र येण्याआधीच पोलिसांनी आशुतोष रांका यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. असा दावा आशुतोष रांका यांनी केला आहे.

अटक होण्यापूर्वी आशुतोष रांका यांनी राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर थेट हल्लाबोल केला. 'आसाममधील सरकारी शाळांची खरी परिस्थिती देशासमोर येईल, या भीतीने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा घाबरले आहेत. काझीरंगा परिसरातील स्थानिक लोकांचे हक्क कसे हिरावले जात आहेत आणि तेथील जमीन, जंगल आणि पाणी बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात कसे घातले जात आहे, हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच ही चिरडशाही सुरू आहे.'
- आशुतोष रांका, सह-संयोजक (CJP)

पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, 'आसाम पोलिसांनी आशुतोष रांका आणि CJP टीमला ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञात स्थळी नेले जात आहे. आशु आणि त्यांचे सहकारी केवळ एका छोट्या मेळाव्यासाठी आसामला गेले होते.'

या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स, पाण्याचे टँकर आणि पोलिस गणवेशातील गोरिल्लाचे व्यंगचित्रात्मक मीम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.