Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दीक्षाभूमीतील देणगीच्या रकमेत अपहार? नागपूरच्या धर्मदाय आयुक्ताकडे लेखी तक्रार

दीक्षाभूमीतील देणगीच्या रकमेत अपहार? नागपूरच्या धर्मदाय आयुक्ताकडे लेखी तक्रार

नागपूर : खरा पंचनामा 

देशभरात वेगवेगळ्या मंदिरातून देणगी चोरीच्या तक्रारी पुढे येत असतांना आता नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आलेल्या देणगी रकमेच्या अपहार झाल्याची तक्रार नागपूरच्या धर्मदाय आयुक्ताकडे करण्यात आली आहे. विलास गजघाटे यांनी हि तक्रार केल्याची माहिती आहे.

दानपेटी सर्वांसमोर न उघडणे, दान स्वरूपात आलेल्या रकमेची माहिती न देणे, धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी बिना निविदा कामाचे वितरण करणे, साहित्य खरेदीत गैरव्यवहार करणे असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. एकंदरीत या तक्रारीमुळे आता नवा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात असून याप्रकरणी आता पुढे नेमकं काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीला देशासह जगभरातून लोक भेट देत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायांचीउपस्थिती असते. 1956 मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा याचठिकाणी घेतली होती. तेव्हापासून दीक्षाभूमी येथे विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन देऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची परंपरा आहे. दीक्षाभूमीला आंबेडकरी अनुयायी आपले प्रेरणास्थान मानतात. त्यामुळे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय हा दीक्षाभूमीला आवर्जून हजेरी लावतात. अशातच आता विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन तोंडावर आला असताना दीक्षाभूमी येथे आलेल्या देणगी रखमेच्या अपहार झाल्याची तक्रारीमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.