Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गप्पा, गाणी अन् गोष्टींतून सांगलीत महिला आरोग्याचा जागरभावे नाट्य मंदिरात रंगला अनोखा उपक्रम

गप्पा, गाणी अन् गोष्टींतून सांगलीत महिला आरोग्याचा जागर
भावे नाट्य मंदिरात रंगला अनोखा उपक्रम

सांगली : खरा पंचनामा 

​सांगलीतील भावे नाट्य मंदिरात राजमती महिला मंडळ आणि रावसाहेब पाटील स्वदेशी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर अनिल मडके बोलतोय’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला आरोग्यासारख्या गंभीर विषयावर नेहमीच्या क्लिष्ट व्याख्यानांऐवजी गप्पा, गाणी, किस्से आणि चित्रपटातील प्रसंगांच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने प्रबोधन करण्यात आले. ज्येष्ठ छातीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे आणि शरीराने दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता वेळीच काळजी घेणे किती गरजेचे आहे, यावर मिश्कील आणि प्रभावी शैलीत प्रकाश टाकला.

​सौ. कांचन रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाला राजमती महिला मंडळाच्या ३०० हून अधिक सदस्यांसह आष्टा, इचलकरंजी, समडोळी आणि ब्राम्हणनाळ यांसारख्या विविध परिसरातील महिलांनी मोठी हजेरी लावली. नेमिनाथ जैन मंदिर ट्रस्टी आणि गोमटेश ग्रुपच्या विशेष सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सौ. स्मिता पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिव सौ. अंजना मगदूम यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष सौ. वर्षा चौगुले यांनी मानलेल्या आभाराने या प्रबोधनात्मक आणि मनरंजक सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.