Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ज्ञानेश कुमार यांचा वापर करून. निवडणूक आयुक्तांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल, थेट मोठा आरोप

ज्ञानेश कुमार यांचा वापर करून. निवडणूक आयुक्तांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल, थेट मोठा आरोप

मुंबई : खरा पंचनामा 

निवडणूक आयोगाच्या वादादरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ज्ञानेश कुमार यांचा वापर करून देशातील नवीन पिढी आणि तरुणाईला मतदार होण्यापासूनच वंचित करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार Gen Z आणि Gen Alpha ला घाबरले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगातील कथित मतभेदांवर त्यांनी सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

NCP (SP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला रोकडा सवाल केला. सरकार Gen Z ला घाबरली आहे का? हे सरकार Gen Z आणि Gen Alpha ला घाबरेलच. यामुळेच ज्ञानेश कुमार यांना मोहरा करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांचा वापर करून देशातील नवीन पिढीला मतदार होण्यापासून वंचित करण्यात आले. त्यासाठी फॉर्म क्रमांक 6 आणण्यात आला. हा केवळ दोन पानी अर्ज आहे. आजी-अजोबा काय करतात, आई-वडील काय करतात, याच्याशी तुमचे काय देणेघेणे असा सवाल त्यांनी विचारला.

मी या देशाचा नागरिक आहे. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करा. लोकशाहीचा गळा घोटू नका. त्यांनी सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिप्पणीकडे लक्ष वेधले. पंतप्रधान हे आयुक्तांच्या समितीत आहेत. त्या समितीचा मग काय उपयोग आहे. पंतप्रधान जो निर्णय घेतील. तोच त्यांचे सहकारी घेतील. विरोधी पक्षनेते अशावेळी काय करणार? तीन लोकांची समिती असेल. त्यात एक पंतप्रधान असतील. एक सदस्य नियुक्त करण्यात येईल. एक विरोधी पक्ष नेता असेल. पंतप्रधान आणि नियुक्त केलेली व्यक्ती मिळून दोन-एकने निकाल लागेल. त्यामुळे ज्ञानेश कुमार सारखी माणसं या पदावर असल्याचा आरोप आव्हाडांनी केला.

यापूर्वीच आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाला सांगितले होते की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मतदार यादीचे सर्व्हर इतर कोणी चालवत आहे. संधू आणि जोशी हे सध्या जो आरोप करत आहे. ही गोष्ट तर आम्ही दोन वर्षांपूर्वीच सांगितली. आमचा पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांचे सर्व्हर आणि इतर डिव्हाईस मॅनेज करण्यात आल्याचा आम्ही आरोप केला होता. निवडणूक आयोग आणि इतर काही लोक मिळून हा प्रकार करत आहेत, असे आम्ही अगोदरपासून म्हणत होतो असे आव्हाड यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.