मिरजेत बंदोबस्तावरील पोलिसांसाठी 'आपुलकीचा डबा'
शिवसेनेचे नेते विलासराव देसाई यांचा दहा वर्षांपासून उपक्रम
मिरज : खरा पंचनामा
मिरजेतील गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पोलिसांचा बंदोबस्त मोठया प्रमाणात नेमण्यात येतो. सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना नेते विलासराव देसाई यांनी पोलिसांसाठी 'आपुलकीचा डबा' हा उपक्रम सुरु गेल्या दहा वर्षांपासून सुरु केला आहे.
बंदोबस्त असताना पोलिसांना जेवणाची अडचण निर्माण होते. नेमलेल्या ठिकाणाहून हलता येत नाही. त्यामुळे देसाई यांनी पोलीस, होमगार्ड यांच्यासह बंदोबस्त करणाऱ्यांना जागेवर हा आपुलकीचा डबा सुरु केला आहे. स्वतःच्या घरचे सण समारंभ विसरून जनतेच्या सेवेत बंदोबस्ताचे अहोरात्र काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांसाठी छोटीशी भेट असल्याचे देसाई यांनी सांगितले.
विलासराव देसाई यांच्या गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतुक पोलिसांकडून केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.