Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रात्री गस्त घालणाऱ्या महिला पोलिसावर भयंकर हल्ला, चावा घेतल्याने हातातून भळाभळा रक्त वाहिलं

रात्री गस्त घालणाऱ्या महिला पोलिसावर भयंकर हल्ला, चावा घेतल्याने हातातून भळाभळा रक्त वाहिलं

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील वांद्रे परिसरात एका महिला पोलिसावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री पेट्रोलिंग करताना पोलीस पथकाने गोंधळ घालणाऱ्या एका नशेत असलेल्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तिने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा जोरात चावा घेतला. हा चावा इतका भयंकर होता की महिला पोलिसाच्या हातातून थेट रक्त वाहू लागले. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलीस ठाण्याचे पथक परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना, रस्त्यावर एक महिला गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक तातडीने तेथे पोहोचले. तिथे गेल्यावर संबंधित महिला अतिशय नशेत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्या महिलेला शांत करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या या महिलेने पोलिसांशीच अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांच्या गाडीत बसवताना या महिलेने पोलिसांना जोरात धक्का दिला आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्य हातावर अचानक जोरदार चावा घेतला. चावा इतका तीव्र होता की महिला पोलिसाच्या हातातून रक्त भळाभळा वाहू लागले.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि दुखापत पोहोचवणे या कलमांन्वये वांद्रे पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.