मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा : सांगली-मिरज रस्त्यावर 'रस्ता रोको'
ॲम्बुलन्सला तात्काळ दिली वाट
सांगली : खरा पंचनामा
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा व कुणबी समाजाची फसवणूक करणाऱ्या शासनाला जागे करण्यासाठी सांगली-मिरज रोडवर मराठा बांधवांकडून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे सांगली आणि मिरज दरम्यानची मुख्य वाहतूक जवळपास पाऊण तास पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा काही काळ खोळंबा झाला. सरकार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
रास्ता रोको आंदोलन पूर्ण ताकदीने सुरू असतानाच सांगलीहून मिरजच्या दिशेने रुग्णाला घेऊन जाणारी एक ॲम्बुलन्स तेथे आली. आंदोलनाची तीव्रता मोठी असूनही मराठा आंदोलकांनी तातडीने संवेदनशीलता दाखवत ॲम्बुलन्ससाठी तात्काळ रस्ता मोकळा करून दिला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी दाखवलेल्या जबाबदार आणि संवेदनशील भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.