भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या भावाला आणि पुतण्याला डोकं फुटेपर्यंत मारहाण
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतणे यांना शेती आणि रस्त्याच्या वादातून एका गटाने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाणे हद्दीतील नायगाव खंडेवाडी इथं ही घटना घडली. अमेय अजित सावे (वय ३५) आणि अजित मोरेश्वर सावे (वय ७० वर्षे, राहणार, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर) अशी जखमींची नावं आहेत.
पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी इथं शेती आणि रस्त्याच्या कामावरू वाद निर्माण झाला. त्यावेळी गावातील एका गटाने अमेय अजित सावे आणि अजित मोरेश्वर सावे यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये दोघेही जखमी झाले आहे. डोक्याला मार लागल्यामुळे दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने बिडकीन इथं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते आणि पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयामध्ये दोघांची विचारपूस सुरू आहे, पोलिसांकडून जबाब नोंदवला जात आहे.
सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री अतूल सावे यांच्या भावाला अशा प्रकारे मारहाण झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतील हे पाहण्याचं ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.