अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या पाच-सहा वर्षांपासून गाजत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने सामूहिक बलात्कार, हत्या आणि षडयंत्र रचल्याच्या आरोपांखाली हा गुन्हा नोंदवला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या जबाबामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड, सचिन वाझे, परमबीर सिंग, अनिल देशमुख, दिनो मोरिया आणि सुरज पांचोली यांच्यासह मालवणी पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची नावे संशयित म्हणून नमूद करण्यात आली आहेत. सीबीआयने संशयित गुन्हा या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. उच्च न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले आहेत की, जबाबातील नावांना लगेच आरोपी मानू नये, तर भक्कम पुराव्यांच्या आधारे तपास करून आरोपपत्र दाखल करावे. येत्या काळात सीबीआयचा तपास काय दिशा घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.