कमिशनरचे पद सोडले, भाजपात प्रवेश, दोन दिवसात IAS ला मिळाले लोकसभा पोटनिवडणूकीचे तिकीट
नगाव : खरा पंचनामा
भाजपाने शुक्रवारी आसामच्या नगांव लोकसभा जागेच्या पोट निवडणूकीसाठी माजी IAS अधिकारी देबाशीष शर्मा यांना आपला उमेदवार म्हणून घोषीत केले आहे. ६ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. आणि ९ ऑक्टोबरला मतमोजणी आहे.
खास बाब म्हणजे देबाशीष शर्मा यांनी ३ सप्टेंबर रोजी आपली नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. याआधी ते नगांवचे जिल्हा आयुक्त होते. परंतू ३ सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आणि ८ सप्टेंबर रोजी भाजपात ते सामील झाले होते. आणि पक्षात सामील होण्याच्या दोन दिवसात आतच त्यांना नगांवमधून तिकीट मिळाले.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर प्रद्युत बोरदोलोई यांनी येथून विजय मिळवला होता. परंतू त्यानंतर ते भाजपात सामील झाले होते. आणि विधानसभा निवडणूकीत दिसपूरमधून विजय मिळवला होता. ज्यामुळे नगांव सीटवर आता पोट निवडणूक होत आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसैन यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्या जवळ तक्रार नोंदवली होती. त्यांनी नगांवच्या जिल्हा आयुक्त म्हणून शर्मा यांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांची चौकशी करण्याची आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.
देबाशीष शर्मा यांनी इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन आणि पब्लिक रिलेशन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. १९९२ मध्ये आसामच्या सिव्हील सर्व्हस मध्ये ते सामील झाले. त्यांची पहिली पोस्टींग बारपेटा येथे झाली होती.
त्यांनी आसामचे तत्कालिन गव्हर्नर लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांचे स्पेशल ऑफीसर आणि मुंबईतील आसाम भवन डेप्युटी रेसिडेंट कमिश्नर म्हणून देखील काम केले आहे. नगांव डेप्युटी रेसिडेंट कमिश्नर म्हणून देखील काम केले आहे. नगांव येथे नियुक्ती होण्याआधी देबाशीष शर्मा यांनी गुवाहाटी पालिकेचे आयुक्त आणि मोरीगाव जिल्ह्याचे आयुक्त म्हणूनही काम केले आहे. आणि नगांवमध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शर्मा कँसर केअर ऑर्गनायझेशन 'दीपशिखा'च्या फाऊडिंग चेअरमन आणि ट्रस्टी देखील आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.