Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मी अपयशी ठरलो, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय..! अभिजीत दीपकेंनी उडवून दिली खळबळl

मी अपयशी ठरलो, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय..! अभिजीत दीपकेंनी उडवून दिली खळबळl

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या एका पोस्टने राजकारणात खळबळ उडाली आहे. मी अपयशी ठरलोय, त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय, अशी पोस्ट करत दिपके यांनी चक्क स्वतःला मुख्यमंत्री संबोधले आहे. एवढेच नाही तर तसे लेटरहेडही तयार करून त्यावर राजीनाम्याचा उल्लेख करत तो राज्यपालांकडे दिल्याचे नमूद केले आहे.

अभिजीत दिपके यांच्या पोस्टने मोठा वाद निर्माण झाला आहे. ते सध्या मध्य प्रदेशात आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील बालाघाट जिल्ह्यात ३० हून अधिक आदिवासी मुलांचा मृत्यू झाला आहे. विविध आजारांमुळे होत असलेले हे मृत्यू रोखण्यात स्थानिक आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचा आरोप होत आहे. यापार्श्वभूमीवर दिपके यांनी बालाघाटमध्ये जाऊन स्थानिकांची भेट घेतली.

बालाघाटमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शनिवारी स्थानिक मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह प्रशासनावर जोरदार टीका कली होती. त्यानंतर रात्री त्यांनी मी उद्या मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या कार्यालयात माझा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी जाणार असल्याची पोस्ट केली होती. तर रविवारी सकाळी त्यांनी थेट राज्यपालांना उद्देशून लिहिलेला प्रतिकात्मक राजीनामाच सोशल मीडियात पोस्ट केला.

अभिजीत दिपके यांनी थेट मध्य प्रदेश सरकारचे लेटरहेड तयार करून त्यावर स्वतःचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. राज्यपालांना उद्देशून लिहिलेल्या या राजीनामा पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बालाघाटमध्ये ३० हून अधिक आदिवासी मुलांच्या मृत्यूची जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी वेळेत आरोग्य सुविधा देण्यात अपयशी ठरलो. राज्यात २१ वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही आम्ही आदिवासी कुटुंबांना स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशा आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण देऊ शकलो पाणी, पुरेशा आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण देऊ शकलो नाही.

केवळ बालाघाटच नाही तर संपूर्ण राज्यातील आदिवासी मुलांचा जीव वाचविता न आल्याने मला या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, दिपके यांच्या या पोस्टनंतर वाद निर्माण झाला आहे. या पोस्टवर काहींनी प्रतिक्रिया देत दिपकेंना अटक करण्याची मागणी केली आहे. स्वतःला मुख्यमंत्री म्हणत, मध्य प्रदेश सरकारचे बनावट लेटरहेड तयार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.