Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'झामल झामल करू नको, राजीनामा दे', MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातले फलक ठरले चर्चेचा विषय; नागपुरात मोर्चा

'झामल झामल करू नको, राजीनामा दे', MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातले फलक ठरले चर्चेचा विषय; नागपुरात मोर्चा 

नागपूर : खरा पंचनामा 

एमपीएससीच्या कथित पेपरफुटीप्रकरणी अध्यक्ष विवेक भीमनवार व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करत विदर्भातील विद्यार्थ्यांनी बुधवारी संविधान चौकात मोर्चा काढला. २०२२ पासूनच्या सर्व परीक्षांच्या चौकशीची मागणीही यावेळी करण्यात आली.

झामल झामल वाक्प्रचार विदर्भातील बोलीभाषेतील आहे. या शब्दाचा अर्थ वेळ काढून पणा करणे असा आहे. एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संविधान चौकात एकत्र येत आपल्या मागण्यांकडे शासन आणि आयोगाचे लक्ष वेधले. परीक्षा देण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांचा निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विदर्भाच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरेत मारबत आणि बडग्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी, विशेषतः पूर्व विदर्भात आणि नागपुरातील मध्य नागपूर परिसरातून मारबत आणि बडगे काढले जातात. या माध्यमातून स्थानिक नागरिक सत्ताधारी आणि विरोधकांविषयीचा रोष, नाराजी आणि उपरोध व्यक्त करतात.

मारबत आणि बडगे हे केवळ उत्सवाचे स्वरूप नसून स्थानिकांच्या अभिव्यक्तीचे साधन मानले जाते. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर नागरिकांना आपली भूमिका उपरोधिक पद्धतीने मांडण्यासाठी या परंपरेतून व्यासपीठ मिळते. त्यामुळे विविध प्रश्नांवरील जनक्षोभाला या माध्यमातून वाट करून दिली जाते. झामल झामल करू नको राजीनामा दे!, एमपीएससीचे पेपर फोडणाऱ्यांना घेऊन जागे मारबत", असे लिहिलेले फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते याच पार्श्वभूमीवर एमपीएससी पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनीही या परंपरेचा आधार घेत आपला रोष व्यक्त केला. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.

एमपीएससीने २०२२ पासून घेतलेल्या सर्व परीक्षांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. केवळ सध्या चर्चेत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणापुरती चौकशी मर्यादित न ठेवता मागील परीक्षांमध्येही प्रश्नपत्रिका फुटणे अथवा अन्य गैरप्रकार झाले आहेत का, याची तपासणी करावी, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता समोर आल्यास त्यामागील व्यक्ती आणि यंत्रणेचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

पेपरफुटीप्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव यांना पदमुक्त करावे, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. संबंधित पदाधिकाऱ्यांच्या पदावर असतानाच चौकशी झाल्यास तिच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची शासनाने आणि एमपीएससीने तातडीने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी. परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई आणि २०२२ पासूनच्या सर्व परीक्षांची चौकशी करावी, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.