Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी

दिल्ली : खरा पंचनामा 

पाकिस्तानात अन्न-धान्याची कमतरता आहे हे तर सर्वांना ठाऊकच आहे पण आता देशात पाण्याचीही कमतरता आढळून येत आहे.

याचा एक व्हिडिओसोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात पाकिस्तानी सेना पाण्यासाठी एकमेकांना मारहाण करताना दिसून आले. ही घटना खैबर पख्तुनख्वाच्या अप्पर साऊथ वझिरिस्तान भागातील असल्याचा दावा केला जात आहे. पाण्याच्या टँकरवरुन पाक जवानांमध्ये वाद सुरु झाला आणि मग याचे हाणामारीत रुपांतर झाले. परिस्थिती इतकी चिघळली की एसएसजी, फ्रंटियर कॉर्म्स (एफसी) आणि गुप्तचर विभागाच्या जवानांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत एकूण २२ जवान घायाळ झाल्याची माहिती आहे. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओत अनेक सैनिक एकमेकांवर हल्ला करताना आणि लाथा-बुक्क्यांनी एकमेकांवर प्रहार करताना दिसून आले. व्हिडिओतील लोकांची संख्या आणि मारहाणीची तीव्रता पाहता प्रकरण किती गंभीर असू शकते याची कल्पना आपण करु शकतो. तथापि, या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. खरंतर आसमान मांजा भागातील जावन पाणीटंचाईचा सामना करत आहेत. इथे दररोद टँकरद्वारे पाणी पुरवले जाते. यादरम्यानच टँकर आल्यानंतर पहिले SSG आणि काही गुप्त विभागाशी जोडलेल्या जवानांमध्ये वाद सरु झाला आणि मग प्रकरण डतरं चिघळलं की जवान एकमेकांना मारहाण करु लागले. जवानांमध्ये बराच काळ पाण्यावरुन हा वाद आणि मारामारी सुरु होती.

दक्षिण वझिरिस्तान हा फार पूर्वीपासून पाणीटंचाईचा प्रदेश आहे. येथील ६० टक्के लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशात जेव्हा मर्यादित पाणी जेव्हा टँकरमधून येतात तेव्हा वाद निर्माण होतो. असेच व्हिडिओतही घडले, पाण्यासाठी जवानांचा हा संघर्ष पाहून अनेकांनी आता या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, "पाण्यासाठी सैनिकांमध्येच अशी मारामारी होणं खरंच वाईट आहे", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "देशाची सुरक्षा करणारे जवानच पाण्यासाठी भांडताना दिसत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे", आणखी एका यूजरने लिहिले आहे, "पाकिस्तान तर खरंच भिकारी झाल".

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.