Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

MPSC सचिव हरपाळकरांच्या तोंडाला काळं फासलं, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

MPSC सचिव हरपाळकरांच्या तोंडाला काळं फासलं, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

नवी मुंबई : खरा पंचनामा 

राज्य लोकसेवा आयोग (MPSC) भरती परीक्षा पेपरफुटी आणि कारभारातील अनागोंदीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले असताना दुसरीकडे वातावरण आणखीच तापलं आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही काळापासून एमपीएससीच्या परीक्षांमध्ये घोळ सुरू असल्याचे दिसून आले आहे. परीक्षा रद्द होणे, पेपरफुटीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यातच आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज आयोगाच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासण्यात आले आहे.

MPSC औषधं निरीक्षक पेपरफुटी संदर्भात संभाजी ब्रिगेड ने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले होते. त्याच वेळी सरकारला आम्ही इशारा दिला होता मात्र सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे त्यांना ज्या भाषेत समजत त्या भाषेत सांगितलं पाहिजे म्हणून ही संभाजी ब्रिगेड ची प्रतिक्रिया आहे. MPSC चे अध्यक्ष व सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही तर पुढचा नंबर हा MPSC अध्यक्षांचा असेल यात तिळमात्र शंका नाही, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

MPSC चा अभ्यास करणाऱ्या २५ लाख विद्यार्थ्यांच्या व महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेड ने या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि निष्क्रिय सरकारच्या तोंडाला काळं फासलं आहे. महेंद्र हरपाळकर यांच्याविरोधातील आंदोलन हे सरकारला जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेडने मारलेली थप्पड असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासणारे संभाजी ब्रिगेडचे राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठाम उभी राहणार असल्याचं संभाजी ब्रिगेडचे नेते राजेश परकाळे यांनी सांगितलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.