Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक आयोगावरून NDA मध्ये मतभेद? भाजपच्या 3 मित्रपक्षांचे ज्ञानेश कुमारांविरोधात मोठे पाऊल

निवडणूक आयोगावरून NDA मध्ये मतभेद? भाजपच्या 3 मित्रपक्षांचे ज्ञानेश कुमारांविरोधात मोठे पाऊल

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून देशात वादळ उठले आहे. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या दाव्यानुसार, दोन आयुक्तांनी त्यांच्याविरोधात केंद्राकडे नाराजी व्यक्त केली आहे. तर SIR, मतदार याद्यावरून विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दंड थोपाटले आहे. कायदेशीर मार्गही अवलंबिल्या जात आहे. तर त्याचवेळी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही विरोधी पडघम वाजू लागले आहेत. NDA मधील तीन घटक पक्षांनी वेगळा सूर आळवला आहे. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एनडीएमधील मित्रपक्षांनी निवडणूक आयुक्तांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

मतदार याद्यांमध्ये फेरफार आणि इतर कथित आरोपांमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार हटाव अशी घोषणा बाजू सुरू केली आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या सर्व गदारोळात भाजपचे प्रमुख नेतृत्वाने समोर येऊन कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यांचे प्रवक्ते बाजू मांडत आहेत.

तर दुसरीकडे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी निवडणूक आयोगाला प्रकरणात स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. जनतेचा निवडणूक प्रणालीवरून विश्वास उठला तर तो लोकशाहीसाठी घातक ठरेल. यामुळे ज्या काही शंका आणि आरोप होत आहे, त्याचे निरसन आयोगाने करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तर बिहारमधील भाजपचा मित्र पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख आणि खासदार उपेंद्र कुशवाहा यांनी आयोगाला या वादावरून चांगलेच धारेवर धरले.

उपेंद्र कुशवाहा यांच्या मते, मतदार यादी पुनरावृत्ती, उजळणी (SIR) मुद्यावरून जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. मोठा संभ्रम सुद्धा आहे. आपल्याच देशातील लोकांना त्यांच्या आजी-आजोबांची माहिती का विचारली जात आहे, याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. आयोगाने तातडीने याविषयीच्या प्रश्नांची, आरोपांची वस्तुस्थिती लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. पण आयोगाकडून कोणताही खुलासा झाला नसल्याने त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी आता एनडीएमधील घटक पक्ष करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.