Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

1 नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे मोबाईलवर थेट नाव दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

1 नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे मोबाईलवर थेट नाव दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

अनोळखी नंबरवरून फोन आला की समोर कोण आहे, हे समजणे आता सोपे होणार आहे. समोर दूरसंचार विभागाने (DOT) दूरसंचार कंपन्यांना १ नोव्हेंबर २०२६पासून 'कॉलिंग नेम प्रेझेंटेशन' (CNAP) सेवा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 4G आणि त्यापुढील नेटवर्कवर फोन येताना कॉल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर आणि नाव स्क्रीनवर दिसणार आहे.

कॉल आल्यावर फोनच्या स्क्रीनवर पहिल्या क्रमांकावर कॉल करणाऱ्याचा मोबाइल नंबर आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचे नाव दिसेल. नंबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह असेल तर सेव्ह केलेले नाव दिसेल. नंबर सेव्ह नसेल, तर देशांतर्गत कॉलसाठी संबंधित दूरसंचार कंपनीच्या ग्राहक नोंदणीतील नाव दाखवले जाईल. परदेशातून आलेल्या कॉलसाठी 'International Call' असे दिसेल.

प्रत्येक दूरसंचार कंपनीला ग्राहकांच्या नावांची आणि मोबाइल क्रमांकांची माहिती जोडणारा डेटाबेस तयार करावा लागेल. कॉल आल्यानंतर संबंधित कंपनी या डेटाबेसमधून नावाची माहिती घेऊन ती फोनवर दाखवेल.

मात्र, ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष नियम असतील. कॉल संपल्यानंतर या प्रक्रियेतून मिळालेली नावाची माहिती जतन करता येणार नाही. तसेच Calling Line Identification Restriction (CLIR) सुविधा घेतलेल्या ग्राहकांचे नाव समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही.

व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणातील कनेक्शनसाठी ग्राहकांना आपल्या नंबरसोबत वेगळे अधिकृत नाव दाखवण्याची सुविधा मिळू शकते. यासाठी ट्रेडमार्क नोंदणी किंवा GST पोर्टलवर नोंद असलेले व्यापारनाव वापरता येईल. संबंधित कागदपत्रांची दूरसंचार कंपन्यांकडून तपासणी केली जाईल.

CNAP लागू करण्यासाठी 4G आणि 5G नेटवर्कवर यापूर्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या निर्णयामागे TRAIच्या फेब्रुवारी २०२४च्या शिफारसींचाही आधार आहे. ऑक्टोबर २०२५मध्ये TRAIने CNAP सेवा डिफॉल्ट स्वरूपात उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला सहमती दिली होती. 2G, 3G आणि काही लँडलाइन नेटवर्कसाठी ही सेवा कशी लागू करायची, याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.