कोल्हापूर : खरा पंचनामा
'गोकुळ' अध्यक्षपदाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचला आहे. बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड वैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका समविचारी आघाडीतर्फे दाखल करण्यात आली.
याचिकेवर न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती धीरज धोटे यांच्यासमोर सुनावणी झाली.
यामध्ये, महायुतीच्या बारा संचालकांना पुढील सुनावणीत म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान महायुतीचे १२ संचालक आणि राज्य शासनानेही म्हणणे मांडण्यासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने सुनावणी सोमवारी (ता. २) ठेवली आहे.
गोकुळ दूध संघाची अध्यक्ष निवड सभा गुरुवारी गणपूर्तीअभावी अधिकाऱ्यांनी तहकूब केली. यानंतर समविचारी आघाडीने बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. ही निवड ग्राह्य धरावी म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. मात्र, ती मागणी अमान्य केली. याला आव्हान देणारी याचिका सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आली.
'गोकुळ'वर सध्या प्रशासक आहे.
निवडणुकीनंतर १५ दिवसांत अध्यक्ष निवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी तातडीने घेण्यात आली. महायुतीचे १२ संचालक का उपस्थित राहिले नाहीत, उद्याच अध्यक्ष निवड का घेऊ नये, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला.
यावर महायुतीचे गोकुळ संचालक डॉ. चेतन नरके यांच्या वकिलांनी म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, अशी विनंती वकिलांनी म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली. 'समविचारी'च्या १३ संचालकांच्या बाजूने अॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. यावेळी अॅड. श्रीकृष्ण गणबावले उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
