Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संमतीचे लैंगिक संबंध नाते तुटल्याने बलात्कार ठरत नाही; सुप्रीम कोर्टाकडून आरोपीची मुक्तता

संमतीचे लैंगिक संबंध नाते तुटल्याने बलात्कार ठरत नाही; सुप्रीम कोर्टाकडून आरोपीची मुक्तता 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

नात्याचे संबंध बिघडले किंवा तुटल्यानंतर फौजदारी खटले दाखल करण्याच्या प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. हे संबंध चांगले असताना लैंगिक संबंधांना केवळ नातेसंबंध बिघडले किंवा तुटले म्हणून बलात्कार मानले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने म्हटले की, हेतुपुरस्सर फसवणूक, कपटी भावनेने लैंगिक संबंधांसाठी मिळवलेली संमती कायदेशीररित्या अवैध ठरते आणि दुसरीकडे नातेसंबंध संपल्यामुळे महिलेला नंतर संमतीने केलेल्या कृतीचा पश्चात्ताप होतो, अशा प्रकरणांमध्ये फरक करणे महत्त्वाचे आहे.

'पुरुषाला अधिकार असतो' केरळमधील एका व्यक्तीची बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने म्हटले की एखाद्या पुरुषाला त्या नात्यातून बाहेर पडण्याचा अधिकार असतो. त्याचा निर्णय फसवणूक ठरवता येणार नाही. आरोपी संतोष कुमार एन. पी. यांनी केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

संतोष कुमार एन. पी याने आपले पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केले आणि परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवले, असा आरोप पीडित घटस्फोटित महिलेने केला होता. या दोघांचे लग्न म्हैसूरमध्ये झाले होते. हे दोघे लग्न केल्यानंतर १९९६ ते २००३ पर्यंत एकत्र राहिले होते व याची माहितीही पीडितीने न्यायालयाला दिली. नंतर तिने संतोषवर बलात्कार व फसवणुकीची तक्रार केली. त्यावर संतोषने कोर्टात दाद मागितली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.