जरांगेंच्या 500 कोटीच्या ऑडिओ क्लिपचा तपास करणार 'हा' IPS अधिकारी, अंतरवलीच्या 'त्या' आंदोलनानंतर घेतला होता चार्ज
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात सध्या मनोज जरांगेंनी केलेल्या 500 कोटीच्या आरोपांवरुन मोठा वादंग सुरु झाला आहे. गेल्या आठवडाभरापसून महाराष्ट्राच्या राजकारणात कथित ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलंच गाजलं आहे. या ऑडिओ क्लिपवरून दररोज नवनवे दावे प्रतिदावे केले जात असल्यानं राजकारण तापलं आहे. दरम्यान आता 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लीपचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याचा आदेश दिलाय. आता पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन केले जाणार असून जरांगेनी आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी केली जाणार आहे. अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT स्थापन करण्यात आली आहे. त्रीसदस्यीय समिती तपास करणार आहे. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि बजरंग बनसोडेंचाही SIT चा समावेश करण्यात आलाय. ही त्री सदस्यीय समिती ऑडिओ क्लिप प्रकरणाचा तपास करणार आहे.
आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी या आधी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर ज्यावेळी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं त्यावेळी शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. गडचिरोलीच्या नक्षलवादी भागात दोन वर्षांत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
