मुंबई : खरा पंचनामा
मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या केलेल्या आरोपांवर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे भाजप-सेना नेत्यांच्या पत्रकार परिषदांचा धडाका सुरू असताना, आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगलेले असताना दुसरीकडे माझी बदनामी करणाऱ्यांची लवकरात लवकर चौकशी करा नाहीतर या सगळ्या षडयंत्राच्या मागे मुख्यमंत्री फडणवीस आहेत, असे मी समजेन, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जरांगे पाटलांना ५०० कोटी मिळाल्याची कुजबूज संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांचे ५०० कोटींचे आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावल्यानंतर श्रीकांत शिंदे या सगळ्या प्रकरणावर काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यांनी या प्रकरणावर मिश्किल पद्धतीने भाष्य केले आहे. एकत्रित ५०० कोटी कसे दिसतात, ५०० कोटी ठेवायला किती गाड्या लागतील, याचा मी शोध घेतोय, असे जरांगे पाटील म्हणाले.
एकत्रित ५०० कोटी कसे दिसतात हे मला पाहायचंय
ज्या माणसाने मला पाचशे कोटी रूपये दिले असे म्हटले जात आहे, त्या माणसाला मी शोधत आहे. एकत्रित पाचशे कोटी रूपये कसे दिसतात याची आम्ही चर्चा करतो आहे. मनोज जरांगे पाटील यांना पडलेला प्रश्न मलाही पडलाय, असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
भाजप शिवसेनेत तू तू मैं मैं
जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर संबंधित क्लिपमध्ये भाजपशी संबंधित नावे असल्याचे रोखठोकपणे शिवसेना नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हात झटकले. दोन्ही पक्षात यावरून आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे.
श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मला ५०० कोटी दिले, त्या ऑडिओ क्लिपमध्ये दावा
मनोज जरांगे पाटील हा डाव्या शक्तींना मदत करतो आहे.
मराठवाड्यात त्याला रोखण्यासाठी आपल्याला नरेटिव्ह सेट करावेच लागेल, त्यासाठी त्याला बदनाम करावे लागेल, असा उल्लेख असलेली कथित आयटी सेलमधल्या बैठकीतील ऑडिओ क्लिप मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवली. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत जरांगे पाटील यांना ५०० कोटी रूपये पोहोचल्याचा दावा संबिधित ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
