मुंबई : खरा पंचनामा
राज्यात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीसाठी शुक्रवारी (ता. २३ जानेवारी) मतदान पार पडले. मतदारासाठी पदवीचे शिक्षण बंधनकारक आहे. निवडणुकीत सर्वच आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला. मात्र, 288 पैकी 155 आमदार या पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी मतदारच नव्हते. राज्यातील विधानसभेचे 133 आमदारच शैक्षणिक पात्रताप्राप्त (पदवी) असल्याची माहिती विधान भवनातील सूत्रांनी दिली.
राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी चुरशीने मतदान झाले. पदवीधरच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर तर, शिक्षक मतदार संघासाठी अमरावती आणि पुणे विभागासाठी निवडणूक झाली. येत्या २७ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पदवीप्राप्त शिक्षक हे पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या उमेदवारांना मतदान करू शकले. केवळ पदवीप्राप्त असलेल्यांनी आपल्या पक्षाच्या 'पदवीधर' उमेदवारांना मतदान केले.
राज्याच्या विधानसभेतील २८८ पैकी सर्वाधिक ८२ आमदार सामान्य विषयातून पदवीप्राप्त आहेत. त्याखालोखाल २२ आमदार एलएलबी आणि १७ आमदार अभियांत्रिकीची पदवी घेतलेले आहेत. सहा आमदार डीएड, बीएड उत्तीर्ण असल्याचेही विधानभवनाकडून सांगण्यात आले.
पक्षाच्या आदेशानुसार सर्वच आमदारांनी आपापल्या उमेदवारांचा मतदारांपर्यंत जाऊन प्रचार केला, पण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आमदार या निवडणुकीसाठी मतदार नव्हते. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सदस्यांनी या निवडणुकीचा प्रचार मतदारांच्या घरोघरी जाऊन केला. याशिवाय सर्वच पक्षांचे आमदार, मंत्री देखील प्रचारात दिसले. विशेष बाब म्हणजे 288 मधील 133 आमदारच या निवडणुकीसाठी (पदवीधर) मतदार होते. यात काही मंत्री देखील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
